दुर्दैवी : रामशेज किल्ल्यावरील कुंडात पडून युवकाचा मृत्यू…..

नाशिक (प्रतिनिधी) : दिंडोरी तालूक्यातील जानोरी येथे राहणाऱ्या रितेश पाटील या १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू घटना समोर आली आहे. रितेश रामशेज किल्ल्यावर आपल्या मित्रांसोबत फिरायला गेला असता तेथे असलेल्या पाण्याच्या कुंडात पडल्याने त्याला डोक्याच्या मागील बाजूस गंभीर दुखापत झाली. तेथे असलेल्या युवकांच्या सहकार्याने रितेशला कुंडातून बाहेर काढण्यात आले. त्याच्यासोबत असलेल्या मित्रांनी त्याला उचलून पायथ्यापर्यंत आणले. त्यानंतर रुग्णवाहिकेमध्ये त्याला जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.