दिलासादायक : या तारखेपासून पुन्हा धावणार पंचवटी एक्स्प्रेस…

नाशिक (प्रतिनिधी) : कोविड-१९ चा प्रसार वाढू नये म्हणून देशासहीत राज्यातसुद्धा रेल्वेसेवा बंद करण्यात आली होती. मात्र आता अनलॉक टप्पा सुरु झाला असून परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे. नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी व्यावसायिक तसेच नोकरदार वर्गासाठी महत्वाची रेल्वे अर्थातच पंचवटी एक्स्प्रेस येत्या १२ सप्टेंबरपासून पुन्हा सुरु करण्यात येत आहे.

अजून एक महत्वाची बाब म्हणजे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी ऑनलाईन पद्धतीने आरक्षण करूनच प्रवाशांना पंचवटी एक्स्प्रेसने प्रवास करता येणार आहे. पंचवटी एक्सप्रेस बंद असल्याने चाकरमान्यांचे मोठे हाल झाले होते म्हणून खासदार हेमंत गोडसे यांनी मुंबईमध्ये मध्य रेल्वेच्या व्यवस्थापाकांची भेट घेतली होती. त्यानंतर अखेर पंचवटी एक्सप्रेस सुरु होणार असून चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.