दिंडोरी जवळ बिबट्याच्या हल्ल्यात बालकाचा मृत्यू

नाशिक (प्रतिनिधी): दिंडोरी जवळील एका गावात घरासमोरून बिबट्याने एका बालकाला उचलून नेल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात बालकाचा मृत्यू झाला आहे.

गेल्या काही दिवसांपूर्वी नाशिकच्या मेरी भागात बिबट्याचा वावर होता. या बिबट्याला शोधण्यात वनखाते सपशेल अयशस्वी ठरले. आणि आता बिबट्याचा हा वावर ग्रामीण भागातही दिसून आला आहे. दिंडोरी येथील म्हेळूस्के येथील तीन वर्षाचा मुलगा श्रीरंग खिरवडे हा मुलगा घरासमोर असताना बिबट्याने त्याला शिकार समजून उचलून नेले, ही बाब घरातील लोकांना काळातच गावकरी एकत्र येत रात्री त्याचा परिसरात शोध घेतला होता. नागरिकांची चाहूल लागताच तो पळून गेला मात्र बालक गंभीर जखमी झाले होते. त्या रुग्णालयात दाखल केले मात्र दुर्दैवाने त्याचा मृत्यू झाला आहे.त्यामुळे गावकरी संतापले आहे.

गंगापूररोड-गिरणारे रस्त्यावरील महादेवपूर येथे बिबट्याने दर्शन दिले आहे. त्याने कुत्र्याची शिकार केली होती. तर एका फार्महाऊसच्या सीसीटीव्हीमध्ये बिबट्याचा वावर कैद झाला आहे. यामध्ये बिबट्या फिरत असतांना दिसतो आहे. तर याच परिसारत त्याने कुत्रा देखील मारला आहे. तर मेरी परिसरात सुद्धा बिबट्या दिसला आहे त्यामुळे नागरिक भयभीत आहेत. बिबट्याचे अन्न त्याला मिळत नसल्याने आणि आपले जंगलात होत असलेला वावर यामुळे बिबट्या कधी अन्न तर कधी पाण्याच्या शोधात येत आहे. वनविभागाने लवकरच काहीतरी कारवाई करणे गरजेचे आहे

Add Comment