दातार लॅबला पुन्हा तपासणीची परवानगी

नाशिक (प्रतिनिधी): दातार जेनेटिकला पुन्हा कोरोना नमुने तपासणीची परवानगी देण्यात आली आहे. दातार जेनेटिकच्या कामकाजाची तपासणी करण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक समितीने प्रयोगशाळा सुरु करण्यास अनुकुलता दर्शविल्याने त्यांना कोरोनाचे नमुने तपासणीचे कामकाज सुरु करण्यास अनुमती देण्यात आली आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी दिली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनि ३ मार्च रोजी संपूर्ण परिस्थितीचे अवलोकन आणि कागदपत्रांचे पुनर्वलोकां करून हा नवीन आदेश दिला आहे.