त्र्यंबकेश्वर पाठोपाठच नाशिक जिल्ह्यातील या शहरातही लॉकडाऊन…!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरासोबतच जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असल्याचं दिसतंय. अनेक ग्रामीण भागांसोबातच सिन्नर मध्ये सुद्धा कोरोनाबाधीतांचा आकड्याने ४०० चा टप्पा गाठलाय. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून सिन्नर नगरपालिका क्षेत्रातील तीन किलोमीटर लांबी पर्यंतचा परिसर पुढील १४ दिवसांसाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्यात आला आहे. काल (दि.२१) झालेल्या व्यापाऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते हा महत्वाचा निर्णय घेण्यात आला.

सोमवारी (दि.२०) एकाच दिवसात ६३ रुग्ण आढळून आल्याने लोकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे ४ ऑगस्ट पर्यंत सिन्नर शहर लॉक डाऊन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शहरात लॉकडाऊन असतांना अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. किराणा, भाजीपाला, फळे, दुध इत्यादी व्यवसाय सुरूच राहणार आहे. तसेच अत्यावाश्यक सेवा सुद्धा सुरु राहतील.