तुमच्याकडे बंगला आहे, फ्लॅट आहे.. मला दर महिन्याला पंधरा हजार द्या, नाही तर…

तुमच्याकडे बंगला आहे, फ्लॅट आहे मला दर महिन्याला पंधरा हजार द्या, नाही तर…

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात गुन्हेगारी आणि भाईगिरीने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. रोज घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे नाशिक शहरात गुन्हेगारांना पोलिसांचा धाक राहिलाच नाही की काय असा प्रश्न आता नाशिककर विचारताय.. असाच व्यावसायिकाला धमकावून खंडणीची मागणी करण्याचा प्रकार नाशिकमध्ये घडला आहे.

हे ही वाचा:  नाशिक: फोटो काढण्याच्या नादात पाय घसरून सोमेश्‍वर धबधब्यात पडल्याने युवतीचा मृत्यू

तुमच्याकडे बंगला आहे, फ्लॅट आहे. दोन-दोन दुकाने आहेत, दोघे भाऊ रिक्षा चालवता, तुम्ही भरपूर पैसे कमवता हे सर्व सुरू ठेवायचे असेल तर दर महिन्याला पंधरा हजारांची खंडणी द्यावी लागेल, अन्यथा मी तुम्हाला धंदा करू देणार नाही आणि मारून टाकीन अशी धमकी सराईत गुन्हेगाराने दिली. मालेगाव स्टँण्डवरील एका लॉन्ड्रीच्या दुकानात हा प्रकार घडला. या प्रकरणी संशयित बापू सुभाष लकडे (रा. क्रांतीनगर) याच्याविरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर परदेशी यांनी याबाबतची फिर्याद दिली. त्यांचे मालेगाव स्टँण्ड येथे प्रकाश लॉन्ड्री हे दुकान आहे. दुपारी ३ वाजता दुकानात असताना संशयित बापू लकडे हातात कोयता घेऊन दुकानात आला. परदेशी यांना धक्का देऊन दुकानात बळजबरीने प्रवेश करत खंडणीची धमकी दिली.
नाशिकमध्येसुद्धा खरोखरच निर्बंध शिथिल होणार का ? जाणून घ्या सविस्तर..

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..