तिसऱ्या मजल्यावरून पडून मजुराचा दुर्दैवी मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील शिवरामनगर येथील एका बांधकामाच्या साईटवर सेंट्रिंगचे काम सुरु असतांना तिसऱ्या मजल्यावरून पडून कामगाराचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी (दि.०१) घडली.

राजू पटेल असे कामगाराचे नाव आहे. सेंट्रिंगचे काम सुरु असतांना लाफा घेण्यासाठी तिसऱ्या मजल्यावर गेले होते. तेथे त्याचा पाय घसरला आणि लिफ्टच्या मोकळ्या जागेतून तो खाली पडला. त्याला गंभीर दुखापत झाल्याने बिटको हॉस्पिटलमध्ये दाखल केले. त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. याठिकाणी सुरक्षेच्या अनुषंगाने कुठल्याही प्रकारच्या उपाययोजना केल्या नसल्याने उपनगर पोलीस ठाण्यात ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.