तर मराठा क्रांती मोर्चाला नोटीस बजावणार नाही….

नाशिक (प्रतिनिधी) : मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ता तथा पदाधिकाऱ्यांनी कायदा पाळला तर नाशिक शहर पोलिसांकडून कलम १४९ अनव्ये पोलीस नोटीस बजावणार नाही. तसेच संभाव्य आंदोलनात सार्वजनिक शांतता भंग होणार नाही आणि कायदा व सुव्यवस्थचे प्रश्न निर्माण होणार नाही याची जबाबदारी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांनी घ्यावी. असे आवाहन नाशिकचे पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केले आहे.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मोर्चा आक्रमक झाला असून लोकप्रतिनिधींना शहराची कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे आंदोलन मराठा क्रांती मोर्चाकडून होऊ नये यासाठी पोलीस सतर्क झाले आहेत. शहर पोलिसांनी समन्वयकांना १४९ ची नोटीस दिली आहे. नाशिक जिल्हा मराठा क्रांती मोर्चाच्या समन्व्यकांची पोलीस आयुक्तलयात बैठक झाली. या बैठकीत आयुक्त दीपक पांडे यांनी यावेळी मोर्चाच्या समन्व्यकांशी संवाद साधला.