तर तो व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल करेन…

नाशिक (प्रतिनिधी) : पाथर्डी सर्कल परिसरात राहणाऱ्या २० वर्षाच्या मुलाने १६ वर्षीय अल्पवयीन मुलीसोबत लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करून अश्लील व्हिडीओ काढला. आणि त्या अश्लील व्हिडीओचा वापर करत पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याची धमकी दिल्याची बाब समोर आली आहे.

कृष्ण व्हिला अपार्टमेंट, पाथर्डी सर्कल येथे राहणाऱ्या वनेश वैराळे या मुलाने १६ वर्षीय मुलीला प्रेमात गुंतवून लग्नाचे अमिष दाखवत तिच्या बरोबर शारीरिक संबंध प्रस्थापित केले. मोबाईल मध्ये व्हिडीओ शुटींग काढली. आणि पुन्हा शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दोघांचा अश्लील व्हिडीओ मुलीच्या व्हाट्सअप वर पाठवला. शारीरिक संबंध प्रस्थापित न केल्यास तो व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसारित करण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुलाच्या विरोधात इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.