तर आंदोलन करू! शिक्षकांवर उपासमारीची वेळ….

नाशिक (प्रतिनिधी) : समाजातील मागास, वंचित विद्यार्थ्यांना रोजगार मिळावा यासाठी आणि स्वयंरोजगारभिमुख करण्यासाठी शासनाच्या व्यवसाय शिक्षण योजनेंतर्गत सरकारी शाळांमध्ये व्यावसायिक शिक्षकांची नेमणूक करण्यात आली. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे लॉकडाऊन करण्यात आल्याने हे शिक्षक आर्थिक कोंडीत सापडले आहेत. त्यामुळे त्यांना अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

शिक्षकांवर उपासमारीची वेळ आल्याने शिक्षकांना वेतन मिळावे यासाठी शिक्षक महासंघाच्या वतीने विधानसभा अध्यक्ष नाना पाटोले, शिक्षण मंत्री वर्ष गायकवाड यांच्यासह अनेक मात्रींना निवेदन देण्यात आले आहे. सरकारने या मागण्या मान्य न केल्यास आंदोलन करू असा इशारा शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आला आहे.