तरुणाला मारहाण करत लंपास केली सोनसाखळी!

नाशिक (प्रतिनिधी) : जुने नाशिक परिसरात असलेल्या डिंगरअळी भागात क्रिकेट खेळण्याचा भांडणातून दोघांनी एका तरुणास सशस्त्र हल्ला करून मारहाण करत गंभीर जखमी केल्याचा प्रकार समोर आला आहे. त्याच्या गळ्यातील सोनसाखळी लंपास केली आहे. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार सागर संतोष दाते (रा.संभाजी चौक) हा त्याच्या तीन साथीदारांसह रविवारी (दि.०६) घरासमोर क्रिकेट खेळत होता. यावेळी रोहन देशमुख याच्या वडिलांनी त्यांना घरासमोर खेळण्यास मज्जाव केला. त्यानंतर सांशयित त्या ठिकाणहून निघून गेले काही वेळाने रोहन यास एकटे गाठून शिवीगाळ करत त्याला बेदम मारहाण केली. आणि रोहनच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून नेली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात जबरी चोरीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे.