नाशिक (प्रतिनिधी) : तपोवनातील साधूग्राममध्ये हनुमान मंदिरासमोर असलेल्या वडाच्या झाडाखाली एका ६० वर्षीय वृद्धाच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याचा प्रकार काल (दि.03) घडलाय. संतोष पवार असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या खुनाच्या प्रकरणात आडगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.
याप्रकरणी अधिक माहिती अशी की तपोवन परिसरातल्या एका म्हशीच्या गोठ्यात संतोष पवार हे काम करत होते. पावन दास महाराज यांच्या कुटीत संतोष पवार मित्रांबरोबर बसले होते. त्यानंतर सकाळी त्यांचा मृतदेह कुटी परिसरात आढळून आला. घटनास्थळी पोलिसांना बिड्या, गांजा पिण्याचे चिलीम आढळले आहेत. याप्रकरणी आडगाव पोलीस स्टेशन चे पोलीस अधिकारी पुढील तपास घेत आहेत.