ड्युटीवर जात असलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण करून लुटले..

ड्युटीवर जात असलेल्या सुरक्षारक्षकाला मारहाण करून लुटले..

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर काढले आहे. उपनगर पोलिस ठाणे अंतर्गत ड्युटीवर जात असलेल्या एका सुरक्षा रक्षकला काही अज्ञात इसमांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून लुटल्याचा प्रकार समोर आला आहे.

नाशिकच्या जयभवानी रोड, विराज स्वीट येथून एकलहारा औष्णिक विद्युत केंद्र येथे ड्युटीवर जात असलेल्या एक्स सर्व्हिस मॅन भिकाजी लाला खरात यांना रात्री 11 वाजेच्या सुमार काही अज्ञात चौघांनी धारदार शस्त्राचा धाक दाखवून अडवले. त्यांच्याकडे असलेला मोबाईल फोन आणि काही रोख रक्कम हिसकावून घेत त्यांच्या चेहऱ्यावर आणि डोळ्याला गंभीर मारहाण करण्यात आली आहे. या लुटमरीच्या घटनेत भिकाजी खरात यांना गंभीर दुखापत झाली आहे. माझ्यासोबत झालेला प्रसंग हा दुसऱ्या कोणासोबत घडू नये व यातील आरोपींना तत्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी खरात यांनी केली आहे.
Android मोबाईल वापरताय? बोट्स कंपनीच्या ब्लूटूथ इअर बड्सवर इथे मिळतोय मोठा डिस्काउंट !

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..