डेअरी कंपनीचे कार्यालय फोडून दोन लाख रुपये लांबवले

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर परिसरात डेअरी कंपनीचे कार्यालय फोडून २ लाखांची रक्कम चोरी करण्यात आली. राजीवनगरला भरवस्तीत ही धाडसी चोरी झाल्याने इंदिरानगर पोलिसांच्या कार्यपद्धतीवर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नाशिक शहरात गुन्हेगारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. पोलिसांनी दिलेली माहिती आणि दीपक आव्हाड यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, राजीवनगर येथील पॉवर डेअरी लिमिटेड कंपनीचे ऑफिस आहे. येथे नियमित दूध संकलित केले जाते. रात्रीच्या वेळी चोरांनी ऑफिसचा मागील बाजूचा पत्रा तोडून टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवलेली १ लाख ७५ हजारांची रक्कम आणि डेअरी प्रॉडक्टचे ३६ डबे चोरले. सकाळी हा प्रकार लक्षात आला. याप्रकरणी इंदिरानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.