नाशिकमध्ये भाईगिरी वाढली: जुन्या भांडणाची कुरापत; टोळक्याचा प्राणघातक हल्ला

जुन्या भांडणाची कुरापत; टोळक्याचा प्राणघातक हल्ला

नाशिक (प्रतिनिधी): पवननगर येथील दीपक पारधी व देवचंद केदारे, सुररेश मंडलिक हे पाटीलनगर येथून जात असताना त्यांच्या ओळखीचे दर्शन दोंदे याच्यासह त्याचे बारा साथीदार येत “तुला जास्त माज आला आहे. तू आम्ही इथे असतांना इथला भाई होतो का? तू रोशन जाधव याच्या बरोबर वाद का केले? तो आमचा माणूस आहे तुला माहीत नाही का? तुला हे महागात पडेल” असे मला सांगून शिवीगाळ करत संशयित दर्शन दोंदेने कोयता तर साथीदारांनीही चाकूसारख्या हत्याराने हल्ला केला. देवचंद केदार, संतोष मंडलिक यांच्यावर वार करत गंभीर जखमी केले. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला अाहे.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..