जुन्या भांडणाचा राग मनात धरून, घर जाळण्याचा केला प्रयत्न !

नाशिक (प्रतिनिधी) : सराईत गुन्हेगार असलेल्या ४ जणांनी जुन्या भांडणातून मारहाण करत घर जाळण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार, फिर्यादी चेतन राम कुवर बिगानिया (वय ३३, रा.भद्रकाली नाशिक) हे घरात टीव्ही बघत असतांना बंद दाराखालून धूर येत असल्याने त्यांनी दार उघडले. तर समोर संशयित आरोपी अर्जुन लोट, करण लोट, कमल उर्फ बाबू रामपाल लोट व अक्षय रामपाल लोट हे उभे होते. सदर चौघे रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. दरम्यान, फिर्यादी यांनी आग का लावली म्हणून विचारले असता, चौघांनी घरात घुसून बिगानिया यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचा भाऊ अर्जुन बिगानिया व राहुल बिगानिया यांनाही मारहाण केली. याप्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 0496/2020 दाखल करण्यात आला आहे.