जुने नाशिक नंतर आता हा भाग आजपासून प्रतिबंधित

नाशिक (प्रतिनिधी) : आज (दि.१८) पासून महाराणाप्रताप चौक परिसर पुढील आदेश येईपर्यंत प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोरोनाबाधीतांची वाढती रुग्णसंख्या बघता स्थानिक नगरसेवकांनी हा परिसर प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाला शुक्रवारी (दि.१७) आयुक्तांकडून मान्यता मिळाली. त्यामुळे याठिकाणी आता केवळ अत्यावश्यक सेवाच सुरु राहणार आहे.

रोज शेकडोने वाढणारी रुग्णसंख्या बघता प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मुख्य रस्ता सोडून महाराणाप्रताप चौक, हरेश्वर चौक, महात्मा चौक, औदुंबर सोसायटी, बाजीप्रभू चौक, हनुमान चौक, स्नेह रुग्णालय, आयसीआयसीआय बँक, हिंदी माध्यमिक विद्यालय, ऑर्बिट रुग्णालय आदि परिसर प्रतिबंधित करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिली. सदर परिसर पुढील आदेश येईपर्यंत बंद राहणार आहें.