जिल्ह्यामध्ये १७ ते १९ दरम्यान गारपिटीचा अंदाज

नाशिक (प्रतिनिधी): दक्षिण द्वीपकल्पात नैऋत्येकडील वारे आणि बंगालच्या उपसागरातून येणारे बाष्प तसेच वातावरणातील गारव्यामुळे हवेची वरची बाजू वेगाने बर्फात रुपांतरि होत आहे. घर्षणाने याचे द्रवीकरण होत असल्याने राज्यात १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसासह गारपिटीचा अंदाज हवामान अभ्यासक माणिकराव खुळे यांनी वर्तविला आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात गारपिटीची तीव्रता अधिक राहण्याची शक्यता आहे. देशात ठराविक भागात १५ मार्चपर्यंत अवकाळी पावसासोबत गारपिटीचा कालावधी असतो.