जिल्ह्यात आजपर्यंत 1911 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज; 1430 रुग्णांवर उपचार सुरू

देवळा, सुरगाणा, पेठ, कळवण तालुक्यात एकही कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण नाही

नाशिक (प्रतिनिधी): जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार देवळा, सुरगाणा, पेठ आणि कळवण तालुक्यात एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. तसेच जिल्ह्यातील १ हजार ९११  कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १ हजार ४३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. आत्तापर्यंत २१३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:
नाशिक ग्रामीण मध्ये  नाशिक ६९, चांदवड ०९, सिन्नर ३६, दिंडोरी १२, निफाड ४०, नांदगांव १८,येवला ३९, त्र्यंबकेश्वर ०४, बागलाण १२, इगतपुरी २३, मालेगांव ग्रामीण ०६ असे एकूण  २६८ पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार सुरु असून सुरगाणा, देवळा, पेठ, कळवण या चार तालुक्यात एकही कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण नाही. तसेच  नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ९९६ , मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात १२७ तर जिल्ह्याबाहेरील ३९  असे एकूण १ हजार ४३० रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच जिल्ह्यात आजपर्यंत 3 हजार 554 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत.

मृत्यू :
नाशिक ग्रामीण ३८ ,नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून ९१, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून ७३ व जिल्हा बाहेरील ११  अशा एकूण २१३  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

सदर आकडेवारी शनिवार (दि. २७ जून २०२०) सकाळी 11.00 वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.