जिल्ह्यात आजपर्यंत ४८ हजार १२३ रुग्ण कोरोनामुक्त ; १० हजार १२३ रुग्णांवर उपचार सुरू….

नाशिक (प्रतिनिधी) : जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज (दि.१८) प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील ४८  हजार १२३ कोरोना बाधीतांना डिस्चार्ज देण्यात आला असून  सद्यस्थितीत १० हजार ३३६ रुग्णांवर उपचार सुरु असून आत्तापर्यंत ११२६  रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.

उपचार घेत असलेले पॉझिटिव्ह रुग्ण:

नाशिक ग्रामीण मध्ये नाशिक ४३८, चांदवड १९०, सिन्नर ३९९, दिंडोरी १६०, निफाड  ८९१, देवळा ९४,  नांदगांव ३८४, येवला ११५, त्र्यंबकेश्वर ३६, सुरगाणा २२, पेठ १५, कळवण ७५,  बागलाण ३०१, इगतपुरी १७६, मालेगांव ग्रामीण ३१२ असे एकूण ३ हजार ६०८  पॉझिटीव्ह रुग्णांवर उपचार आहे. तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात ६ हजार ०९७, मालेगांव महानगरपालिका क्षेत्रात ५५७  तर जिल्ह्याबाहेरील ७४ असे एकूण १० हजार ३३६ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.  तसेच आजपर्यंत जिल्ह्यात  ५९  हजार ५८५  रुग्ण आढळून आले आहेत.

रुग्ण बरे होण्याची टक्केवारी

जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी  नाशिक ग्रामीण मधे ७४.०६,  टक्के, नाशिक शहरात ८३.५१ टक्के, मालेगाव मध्ये  ७८.८९  टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ७०.२४ टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण ८०.७६  इतके आहे.

मृत्यु :

नाशिक ग्रामीण ३४२, नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून  ६२१ मालेगांव महानगरपालिका क्षेत्रातून १३७  व जिल्हा बाहेरील २६ अशा एकूण ११२६  रुग्णांचा मृत्यु झाला आहे.

(वरील आकडेवारी आज सकाळी ११.०० वाजता  जिल्हा सामान्य रुग्णालयाकडून प्राप्त माहितीच्या आधारे नमूद करण्यात आली आहे.)