जिल्ह्यातील अनाथ बालकांना मिळणार ओळखपत्र…

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्ह्यातील ज्या मुलांना पालक नाहीत अशा अनाथ मुलांना ओळखपत्र मिळणार आहे. बालगृहातून शिक्षण घेऊन बाहेर पडल्यानंतर त्यांना दाखले मिळण्यासाठी अनेक अडचणी येतात. म्हणून शासनाने अशा अनाथ मुलांना प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेतला होता.

येत्या 14 नोव्हेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत अनाथ प्रमाणपत्र पंधरवडा आयोजित केला आहे. त्यामध्ये जिल्ह्यातील अनाथ मुलांना ओळखपत्र देण्यात येणार आहे. अशी माहिती महिला व बालविकास समितीचे अधिकारी अजय फडोळ यांनी दिली.