जिल्हा परिषद खरेदी करणार ९० हजार अँटीजेन किटस्!

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरासह ग्रामीण भागात देखील कोरोनाचा शिरकाव होऊन प्रादुर्भाव वाढत चालला आहे. त्यामुळे सोमवारी (दि.१४) जिल्हा परिषदेची ऑनलाईन सभा घेण्यात आली. या सभेत किट्सच्या खरेदीसाठी आठ कोटींच्या मंजुरीचा निर्णय घेण्यात आला आहे.

अनावश्यक खरेदी टाळता पुरवठादारांकडून किंमतीत तडजोड करून कोरोनासाठी लागणाऱ्या अत्यावश्यक अॅन्टिजेन किटच्या खरेदीला महत्त्व देण्यात यावे अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली होती. त्यानंतर या सभेत मान्यता दिलेल्या निधीमधून नाशिक विभागातील ग्रामीण भागांसाठी ९० हजार तपासणी किट्स खरेदी करण्यात येणार आहेत. त्यामध्ये ५० हजार रॅपिड किट्स आणि ४० हजार व्हीटीएम तपासणी किट्सचा समावेश असणार आहे. सिन्नर, निफाड, नांदगाव, बागलाण आणि नशिक या तालुक्यांमध्ये या किट्सचा वापर करता येणार आहे.