जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यास लाच घेतांना अटक

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील उपशिक्षणाधिकारी भाऊसाहेब चव्हाण यांना सहा हजार रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाच्या पथकाने काल (दि.१०) अटक केली आहे. भाऊसाहेब चव्हाण यांनी शिक्षक पती-पत्नीकडून सेवा पुस्तीकेवर सही करण्यासाठी १५ हजर रुपये लाच मागितली. यामध्ये तडजोड करून शेवटी सहा हजर रुपयें घेऊन स्वाक्षऱ्या करण्याचे ठरले.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

ही माहिती लाचलुचपत प्रतिबंधात्मक विभागाला समजताच या पथकाने शुक्रवारी (दि.१०) संध्याकाळी सापळा रचून भाऊसाहेब चव्हाण यांना लाच स्वीकारतांना रंगेहाथ पकडून अटक केली.