जिल्हाधिकाऱ्यांचे पाकीट हरवले की, चोरले गेले ?

नाशिक (प्रतिनिधी): शहरात विवाह सोहळ्या दरम्यान, चोरीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. मात्र, ज्या विवाह सोहळ्यात उपमुख्यमंत्री, पालकमंत्री, अधिकारी वर्ग, राजकीय नेते व विशेषत: पोलीस आयुक्त व पोलिसांची मोठी फौजच उपस्थित होती, अशा विवाह सोहळ्यात खुद्द जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांचे पाकीट गहाळ झाले. की, एखाद्या चोरट्याने गर्दीचा फायदा घेत पाकीट चोरले. हे पोलिसांना रात्री उशिरापर्यंत तपास करून देखील समजून आले नाही.

पाकीट गहाळ झाल्याची माहिती मिळताच, पोलीस आयुक्त दिपक पांडे व उपायुक्त अमोल तांबे तसेच इतर अधिकाऱ्यांनी तातडीने शोधाशोध केली. मात्र, पाकीट सापडले नाही. तर, पाकिटमध्ये ओळखपत्र व क्रेडिट कार्ड असल्याचे मांढरे यांनी सांगितले. तसेच रविवारी दिवसभर अनेक ठिकाणी गेल्याने नेमके पाकीट कुठे गहाळ झाले हे सांगता येणार नाही. असे देखील मांढरे यांनी सांगितले. तर पोलिसांकडून पाकीट चोरी झाले की गहाळ याची खात्री करण्याचे काम सुरु आहे. असे रात्री उशिरापर्यंत सांगण्यात येत होते.