जितेंद्र मोटर्सच्या शोरूमला आग ; कोट्यावधींचे नुकसान!

नाशिक (प्रतिनिधी) : पाथर्डी फाटा येथे असलेल्या जितेंद्र मोटर्स च्या कारखान्याला काल रात्री अचानक आग लागली. जोरदार पावसामुळे शोर्टसर्किट होऊन आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. सुदैवाने या आगीत जीवित हानी झाली नाही. मात्र कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे.

या आगीत संपूर्ण प्रकल्प जाळून खाक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. इलेक्ट्रोनिक बाईकचे सर्व स्पेअर पार्टस, कच्चा माल तसेच असेम्ब्ली या आगीत जळाल्याचा अंदाज आहे. अग्निशामक दलाच्या दोन तासांच्या अथक परीश्रामानंतर हि आग आटोक्यात आली. कंपनीचे संचालक जितेंद्र सहा आणि संकेत शहा यांनी नुकसान किती झाले याचा अंदाज लावणे अवघड असल्याचे स्पष्ट केले.