जलकुंभावर चढून, नगरसेवकाने केले शोले स्टाईल आंदोलन !

नाशिक (प्रतिनिधी) : गेल्या ८ ते १० दिवसांपासून, शहरातील अश्विननगर, मोरवाडी, पाथर्डी फाटा, दौलतनगर या परिसरामध्ये पाणीटंचाईची नागरिकांना समस्या जाणवत आहे. दरम्यान, वारंवार तक्रार करून देखील पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळे शिवसेनेच्या महिला नगरसेविका किरण दराडे व त्यांचे पती बाळा दराडे यांनी पाथर्डी फाटा येथे जलकुंभावर उभे राहून शोले स्टाईल आंदोलन केले. दरम्यान, संबंधित अधिकाऱ्यांनी पाणीपुरवठा सुरळीत न केल्यास जलकुंभावरून उडी मारण्याचा इशारा देखील त्यांनी दिला. 

हे ही वाचा:  नाशिक शहर: आईला बेशुद्ध करून तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

सिडकोतील प्रभाग क्रमांक २७ अंतर्गत येणाऱ्या परिसरामध्ये गेल्या ८ ते १० दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यानुसार, वेळेवर पाणी न येणे, कमी दाबाने पाणी येणे इत्यादी समस्यांना नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे नगरसेविका दराडे यांनी पाणीपुरवठा विभागातील अधिकाऱ्यांना संपर्क साधला असता, महापौर सतीश कुलकर्णी यांनीच पाणीपुरवठा वळवण्याचे आदेश दिले आहे. असे सांगण्यात आले. तसेच कुलकर्णी यांनी “महापालिकेच्या सिडको विभागाचे उपअभियंता गोकुळ पगारे यांना दमदाटी करून, पाणी सिडकोकडून इंदिरानगर भागात वळविले” असा आरोप करतनगरसेविका दराडे यांनी महापौर कुलकर्णी यांच्या निषेधार्थ जलकुंभावर चढून आंदोलन केले.

हे ही वाचा:  नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा