चौकशीचे आदेश येताच झाली गायब ; गुन्हा दाखल करण्याची धमकी देताच आली परत !

नाशिक (प्रतिनिधी) : देवळाली शिवारातील सर्वे २९५ मधील जागेवरून झालेल्या १०० कोटीच्या टीडीआर घोटाळ्याची चौकशी करण्याचे आदेश येताच नोटीस दिल्याची फायली गायब झाल्याचे सांगण्यात आले होते. यावरून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असता २४ तासात फाईल जागेवर आली असल्याची माहिती आहे. 

देवळाली शिवारातील सर्वे क्रमांक २९५ मधील आरक्षित जागेच्या १०० कोटीच्या टीडीआर घोटाळ्याच्या चौकशीचे आदेश नगरविकास विभागाने दिल्यानंतर शिवसेना नगरसेवक सुधाकर बडगुजर, विलास शिंदे आणि  या घोटाळ्या प्रकरणी याचिका दाखल करणारे वकील शिवाजी सहाणे हे चौकशी समितीचे सदस्य व प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे -पाटील यांच्याकाडे शहा कुटुंबातील सद्स्य स्नेहा यांना पाठवलेल्या नोटीस संदर्भातील माहिती मागितली असता फाईल गायब झाल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही सदस्यांनी घोडे-पाटील यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असता अवघ्या २४ तासात गायब फाईल परत आल्याची चर्चा होत आहे .

शहा कुटुंबाला नोटीस पाठवलेली फाईल एका दिवसात परत आल्याने यात समिती सदस्यांना आश्चर्याचा धक्का बसला असून यात घोडे-पाटील संशयाच्या भोवऱ्यात सापडल्याची चर्चा आहे. तर मनोज घोडे-पाटील यांना समितीतून हटवण्याची मागणी केली जात आहे. संपूर्ण वातावरण तापत असताना चौकशी समितीसमोर पहिला विषय फाईल गहाळ झाल्याही चर्चा झाल्या नंतर प्रशासन उपआयुक्त मनोज घोडे-पाटील नगररचना सहाय्यक संचालक सुरेश निकुंभे यांनी शहा कुटुंबाला दिलेली नोटीस जागेवर असल्याचा निर्वाळा दिला.