चोरीच्या गुन्ह्यांमध्ये वाढ; वडगावकर ज्वेलर्स फोडण्याचा प्रयत्न

नाशिक (प्रतिनिधी) : काल (दि. १७ ऑगस्ट) मध्यरात्रीच्या सुमारास नाशिक रोड परिसरातील शिवाजी रोडवरील वडगावकर ज्वेलर्स हे दागिन्यांचे दुकान अज्ञात चोरट्यांनी फोडण्याचा प्रयत्न केला. पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास या चोरट्यांनी वडगावकर ज्वेलर्स या दुकानाचे शटर आणि कुलूप तोडण्याचा प्रयत्न केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

वडगावकर ज्वेलर्सचे मालक किरण सोनार यांना हा प्रकार लक्षात आला. दुकानातील सीसीटीव्ही कॅमेरे किरण सोनार यांच्या मोबाईल ला जोडलेले असल्याने सोमवारी पहाटे त्यांनी मोबाईल सुरु केला असता त्यांच्या दुकानातील एक कॅमेरा हलत असल्याचे दिसले. त्यांनी तातडीने दुकानाच्या दिशेने धाव घेतली. तेव्हा दुकानाच्या शटरच्या बाहेरील लोखंडी ग्रील आणि कुलूप तुटलेले असल्याचे त्यांना दिसले. सीसीटीव्हीमध्ये तीन चोरटे तोंडाला फडके बांधून चोरी करण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. याप्रकरणाविरोधात नाशिकरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.