चाकू व बंदुकने जीवे मारण्याचा प्रयत्न! म्हसरूळ परिसरातील घटना

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकमधील गुन्हेगारी काही कमी होत नाहीये. म्हसरूळ परिसरात रविवारी नवरा बायकोला चाकूने वर करून जीवे मारण्याचा प्रयत्न एकाने केला.

रविवारी (दि.०५) कलानगर दिंडोरी रोड, म्हसरूळ येथे राहणाऱ्या ३४ वर्षीय संजय कनोजिया हे दुनाकानात असतांना आरोपी कुलदीप उर्फ मनोहर कापसे हा त्यांच्या दुकानासमोर आला आणि त्याने शिवीगाळ करायला सुरुवात केली. “तू माझा कारागीर सागरला माझ काम सोडून द्यायला सांगून का पळवून लावल?” असे म्हणत त्याने अर्वाच्च भाषेचा प्रयोग केला. “तुम्ही लोकं इथे येऊन माजले आहात, तुम्हाला मारून टाकायला पाहिजे.” असे म्हणत कुलदीप ने खिशातून चाकू काढला आणि “तिला इथेच मारून टाकतो” असे म्हणत संजय यांच्या गळ्यावर वार केला. त्यांनतर संजय यांची पत्नी अनिता हिने अडवण्याचा प्रयत्न केला असता तिच्या उजव्या हातावर चाकूचा मार लागला. नंतर कुलदीपने पुन्हा चाकूने संजय यांच्या पोटावर वार केला. तेव्हा संजय मागे सरकल्याने चाकूचा वार डाव्या हाताच्या कोपऱ्याजवळ लागला आणि संजय जखमी झाले. त्यानंतरही कुलदीप थांबला नाही. त्याने खिशातली बंदूक काढून “थांब! यानेच तुला मारतो असे म्हणाला”. त्यामुळे संजय आणि अनिताने बंदूक बघून तिथून पळ काढला.