चंदन वृक्ष चोरणारे दोघे जेरबंद; क्राईम ब्रांचची कारवाई

नाशिक (प्रतिनिधी):  चंदनाचे झाडे चोरी करणार्‍या दोघांना अटक करण्यात आली आहे. गुन्हे शाखा युनिट २ चे पथकाने ही कारवाई केली. विजय लक्ष्मण मुर्गे, भागचंदद राधाकृष्ण तांदळे (दोघे रा. नेवासा ) असे या संशयितचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहर व परिसरात चंदन झाडे चोरी करण्याचे गुन्हे वाढले आहेत.

या गुन्ह्याचा तपास सुरू असताना पथकाला माहिती मिळाली. नेवासा येथे जाऊन दोघांस ताब्यात घेतले. त्यांच्याकडून कार (एमएच १७ एजे ४८२२) आणि चंदनाचे तुकडे असा ५ लाख ५० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. वरिष्ठ निरीक्षक अजय शिंदे, वसंत खतेले, शामराव भोसले, शंकर काळे, बाळू शेळके आदींच्या पथकाने उपआयुक्त संग्रामसिंह निशाणदार यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई केली.