चंदन वृक्ष कापणाऱ्या चोराला रंगेहाथ पकडले !

नाशिक (प्रतिनिधी): त्र्यंबकरोडलगतच्या वासाळीतील शेतकरी शिवराम भावले यांच्या मळ्यातील चंदनाचे झाड कापण्याचा प्रकार सोमवारी (दि. ८ ) पहाटे उघडकीस आला.. भावले कुटुंबियांनी एका चोरट्यास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर पोलिसांनी दुसऱ्या चोराला ताब्यात घेतले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आवाज झाल्याने भावले परिवारातील सदस्य बाहेर आले असता त्यांना चंदन झाड तोडल्याचे दिसले.

लोकं आल्याचा सुगावा लागल्याने एका चोराने पळ काढला. दुसरा झाडाजवळ सापडला. भावले यांनी कळवल्यानंतर पहाटे चारला पोलिसांनी मळ्यात धाव घेत संशयित सुखदेव कातोरे यास ताब्यात घेतले. दुसरा संशयित चंदू खंडवे (रा. अकोले, जि. अहमदनगर) यासही ताब्यात घेतले आहे.