घराच्या पार्किंगमधून चोरटयांनी दुचाकी केली गायब!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरात सध्या वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ होतांना दिसून येत आहे. तर, चोरट्यांची इतकी मजल गेली आहे की, चक्क पाथर्डी शिवारात घराच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली दुचाकी चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली.

पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद विनायक नागरे यांची मोटार सायकल (क्रमांक एमएच १५ जीडी ९०७१) श्रीयोग अपार्टमेंटच्या पार्किंगमध्ये उभी केली होती. दरम्यान, बुधवारी (दि.३० डिसेंबर) रोजी अज्ञात चोरटयांनी दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, पोलिसांकडून या प्रकरणी अधिक तपास सुरु आहे.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक