घरभाडे मागण्यासाठी गेलेल्या मालकावर चाकूने वार!

नाशिक (प्रतिनिधी) : भद्रकाली परिसरात भाडेकरूला पाच महिन्यांचे थकलेले घरभाडे मागण्यासाठी गेलेल्या मालकावर चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. मंगळवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास हि घटना घडली. भद्रकाली परिसरातील शिवाजी चौक येथे राहणाऱ्या ३३ वर्षीय लतेश उपाध्ये यांच्या घरात प्रेमचंद चौहान हे राहत आहेत. मागील पाच महिन्याचे घरभाडे न मिळाल्याने लतेश यांनी विचारणा केली असता प्रेमचंद यांनी त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. तसेच घरात असलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने लतेश यांच्या मानेवर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.