गोल्फ क्लब येथे व्यायाम करतांना एकाचा मृत्यू!

नाशिक (प्रतिनिधी) : भाभा नगर येथील स्मार्ट सोसायटी येथे राहणाऱ्या ६७ वर्षीय वृद्धाचा व्यायाम करत असतांना मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. शामसुंदर हरिहर तालुकदार असे या वृद्धाचे नाव आहे. काल (दि.०२) सकाळी ९.३० वाजेच्या सुमारास तिडके कॉलनीजवळ असलेल्या गोल्फ क्लब ग्राउंड वर सह्म्सुंदर तालुकदार हे व्यायाम करीत होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आल्याने ते बेशुद्ध पडले. आजूबाजूच्या लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली असता पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्या वृद्धांना उपचारासाठी सिव्हील हॉस्पिटल येथे नेण्यात आले. तेव्हा हॉस्पिटलमध्ये उपस्थित तडवी मॅडम यांनी तपासून मयत असल्याचे घोषित केले. या प्रकारामुळे परिसरात हालहाल व्यक्त केली जात आहे.