गोदावरी एक्सप्रेस बंद केली तर प्रवासी संघटना आंदोलनाच्या तयारीत….

नाशिक (प्रतिनिधी) : अनलॉक टप्पा सुरु झाल्यापासून परिस्थिती पूर्वपदावर यावी यासाठी प्रशासनाची धडपड सुरु आहे. नाशिकहून मुंबईला जाण्यासाठी व्यावसायिक तसेच नोकरदार वर्गासाठी महत्वाची रेल्वे अर्थातच पंचवटी एक्स्प्रेस सुरु करण्यात आली. मात्र मनमाड-नाशिकहून मुंबईला जाणारी गोदावरी एक्सप्रेस रेल्वे बोर्ड बंद करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती आहे.

पंचवटी नंतर गोदावरी एक्सप्रेस नाशिक जिल्ह्यातील चाकरमान्यांसाठी सोयीची एक्सप्रेस आहे. त्यामुळे हि गाडी बंद केली तर प्रवासी संघटना नाशिकरोड रेल्वेस्थानकावर आंदोलन करणार आहे. असा इशारा p[रावासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.