गोदावरीतील पानवेलींमुळे होणाऱ्या प्रदुषणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात : राधाकृष्ण गमे

नाशिक (प्रतिनिधी) : गोदावरी नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पानवेलींचे साम्राज्य पसरत चालले आहे. या पानवेली नष्ट करण्यासाठी संबंधित यंत्रणांनी लवकरात लवकर उपाययोजना कराव्या असे निर्देश विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले आहेत.

आज झालेल्या ऑनलाईन बैठकीत राधाकृष्ण गमे बोलत होते. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या गोदावरी नदीच्या काठी तसेच गोदावरी नदीच्या उपनद्यांमध्ये पानवेलींमुळे मोठ्या प्रमाणावर प्रदूषण होत आहे. त्यामुळे गोदाकाठच्या गावांचा समावेश “माझी वसुंधरा” अभियानात करण्यात यावा. आणि प्रदूषण टाळण्यासाठी आदेशांचे काटेकोरपणे पालन करण्यात येईल याची काळजी घ्यावी असे विभागीय आयुक्त म्हणाले.