गॅस गिझरचा शॉर्ट सर्किट झाल्याने महिला ठार: घटना सातपूर मधली

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिक शहरातील सातपूर परिसरात राहणाऱ्या ५८ वर्षीय महिलेचा ६३ टक्के भाजून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सुरेखा रत्नपारखी असे या महिलेचे नाव आहे. काल (दि.२९) दुपारी ४ वाजेच्या सुमारास सुरेखा यांनी गॅस गिझर सुरु केला. त्यावेळी गॅस गिझर चा फ्रेम बाहेर येऊन शॉर्ट सर्किट झाला. यामध्ये सुरेखा या ६३ टक्के भाजल्या. त्यांना हॉस्पिटल मध्ये दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.