गुरु-शिष्याच्या नात्यास काळीमा फासणारी घटना ; शिक्षकाला अटक

नाशिक (प्रतिनिधी): नाशिक शहरातील दिंडोरी रोड परिसरातील गजपंथ स्टॉप वरून एका अल्पवयीन विद्यार्थिनीला आपल्या दुचाकीवर बसवुन तसेच क्लासमध्ये पेंटिंग शिकवित असताना विद्यार्थिनीच्या शरीराला तिच्या संमतीविना बळजबरीने स्पर्श करून अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकास पंचवटी पोलिसांनी अटक केली आहे.

संशयित आरोपी अशोक रघुनाथ नागपुरे (वय,५७ रा. मिलिनियम पार्क, दिंडोरी रोड) असे या शिक्षकाचे नाव आहे. सदर संशयित आपल्या दुचाकीवरून वेळोवेळी विध्यर्थीनीला बसवून ठिकठिकाणी फिरवत असे. गाडी चालवताना स्त्री मनाला लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील कृत्य करायचा असे पीडितेने तक्रारीत सांगितले आहे. पेंटिग काढत असताना वारंवार विध्यर्थीनीच्या कपड्यासोबत छेडछाड करत अश्लील चाळे केल्याचेदेखील पिडीतेने तक्रारीत सांगितले आहे. याप्रकरणी संशयित नागपुरेविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करून अटक करण्यात अली आहे.