गुरुवारी शहरातील पाणीपुरवठा बंद!

नाशिक (प्रतिनिधी) : शहरातील सकाळचा आणि संध्याकाळचा पाणीपुरवठा गुरुवारी (दि.२२) बंद राहणार आहे. गंगापूर धारण वॉटर पंपिंग स्टेशनवर महावितरण कंपनीकडून ओव्हरहेड लाईन भूमिगत करण्यासाठी वीजपुरवठा बंद असणार आहे. नाशिक पश्चिमसह सातपूर, नाशिकरोड तसेच पंचवटी विभागात संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार आहे. नाशिक पूर्व आणि नवीन नाशिक याठिकाणी काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. शुक्रवारी सकाळपासून पाणीपुरवठा सुरळीत सुरु राहणार आहे.