गंमत जंमत हॉटेलजवळ गाडीत आढळला बेपत्ता तरुणीचा मृतदेह

नाशिक (प्रतिनिधी): इंदिरानगर परिसरातून बेपत्ता झालेल्या २१ वर्षीय तरुणीचा मृतदेह गंगापूर येथील हॉटेल गंमत जंमत आढळून आला आहे.

इंदिरानगर परिसरात राहणाऱ्या श्रीपर्ण रॉय २१ वर्षीय मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार  सोमवारी तिच्या कुटुंबीयांनी इंदिरानगर पोलीस ठाण्यात दिली होती. ही तरुणी चारचाकी गाडीसह बेपत्ता आहे असे सांगण्यात आले होते. या तरुणीचा तपास करत असतानाच पोलिसांना मंगळवारी रात्री गंगापूर परिसरात हॉटेल गंमत जंमत जवळ गाडीमध्ये ही तरुणी मृत अवस्थेत आढळून आली. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. ही आत्महत्या आहे की खून याबाबत पोलीस सर्व दिशांनी तपास करत आहेत.