गंगापूर रोड: युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

गंगापूर रोड: युवकाच्या खूनप्रकरणी दोघांना ७ वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

नाशिक (प्रतिनिधी): खुनाच्या गुन्ह्यात दोघा आरोपींना सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली. गुरुवारी (दि. २२) प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. एस. वाघवसे यांनी ही शिक्षा ठोठावली. आकाश सुरेश पवार (रा. शिवाजीनगर) व तुषार दिनेश लांडे (रा. अशोकनगर) असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपींची नावे आहेत.

हे ही वाचा:  नाशिक पोलिस आयुक्तालयापासून हाकेच्या अंतरावर कोयताधाऱ्यांचा धिंगाणा

अभियोग कक्षाने दिलेल्या माहितीनुसार, २९ जानेवारी २०१८ रोजी सिद्धिविनायक गार्डनच्या पाठीमागे शिवशक्ती चौकात मयत बबन सोमा बेंडकुळे (वय: २५, रा. शिवाजीनगर) हा फोनवर बोलत असताना आरोपी आकाश सुरेश पवार (वय: २७) आणि तुषार दिनेश लांडे (वय: २८) यांनी दुचाकीने पाठीमागून येत विनाकारण डोक्यावर चापट मारली. याबाबत बबनने विचारणा केली असता संशयितांनी बबनच्या पोटावर, मांडीवर आणि हातावर चाकूने वार करत त्यास गंभीर जखमी केले आणि तिथून पळून केले. गंभीर जखमी अवस्थेत खासगी रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

हे ही वाचा:  नाशिक हादरलं! तीन महिन्यांच्या चिमुकलीची गळा चिरून निर्घृण हत्या

संशयितांच्या विरोधात गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा (गुन्हा रजिस्टर नंबर: २२/२०२१८) दाखल करण्यात आला होता. तत्कालीन उपनिरीक्षक एस. एस. वाघ यांनी आरोपींच्या विरोधात सबळ पुरावे गोळा करत आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले होते. प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अभय वाघवसे यांनी तपासी अधिकारी, साक्षीदार, पंच आणि परिस्थितीजन्य पुराव्यास अनुसरून सात वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. सरकार पक्षाकडून अॅड. योगेश कापसे यांनी कामकाज पाहिले. पैरवी जी. ए. पिंगळे, एस. यू. गोसावी यांनी पाठपुरावा केला.

हे ही वाचा:  निर्दयी आई.. त्या तीन महिन्याच्या चिमुकलीची हत्या आईनेच केल्याचे निष्पन्न..