नाशिक (प्रतिनिधी): गंगापूर रोड येथील केटीएचएम महाविद्यालयाजवळील असलेल्या मॅरेथॉन चौकात आज (दि. २१ जानेवारी २०२१) सकाळच्या सुमारास चालत्या दुचाकीवर झाड कोसळल्याची घटना घडली. मात्र दैव बलवत्तर म्हणून कुठलीही जीवितहानी झाली नाही. या अपघातात दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. चालकाने वेळीच प्रसंगावधान दाखवल्यामुळे त्याचा जीव वाचला. या घटनेनंतर अग्निशमन विभागाने तात्काळ घटना स्थळी पोहचून हे झाड हटवले.
गंगापूर रोड; केटीएचएम कॉलेजजवळ चालत्या दुचाकीवर कोसळले झाड
1 year ago