गंगापूर रोडवरील हॉटेलला लागली आग.. कुठलीही जीवीत हानी नाही..

जयेश साबळे, महाराष्ट्र एक्सप्रेस ग्रुप, नाशिक
नाशिकच्या गंगापूर परिसरात असलेल्या हॉटेल गंम्मत जम्मतला भिषण आग लागल्याची घटना मंगळवारी सायंकाळच्या सुमारास घडली.  मोठमोठ्या आगीच्या ज्वाळा यावेळी दिसून येत होत्या, तर या घटनेमुळे एकच भीतीचे वातावरण पसरून मोठी धावपळ उडाली होती. शॉट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे. ह्या आगीत मोठ्या प्रमाणावर सामान जळून खाक झाल्याने हॉटेलचे मोठे नुकसान झाले आहे.

तर सुदैवाने ह्या घटनेत कुठलीही जिवीत हानी झालेली नसल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन विभागाने तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन आगीवर नियंत्रण मिळवत आग आटोक्यात आणली. तर या घटनेचा पोलिसांमार्फत  अधिक तपास सुरु आहे.