नाशिक (प्रतिनिधी): मुंबई नाका पोलिसठाण्यात खोटे खरेदीखत व बनावटी चेक देऊन एका व्यक्तीला फसवल्याप्रकरणी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दादाजी पुंजाजी आहिरे (रा. देवळा) यांनी फिर्याद दाखल केली आहे. आकाशवाणी रोड वरील रहिवासी संगीता गांगुर्डे, मयूर गांगुर्डे,सुशांत गांगुर्डे व अजुन चार संशयितांची नावे यामध्ये आहेत. संशयितांनी संगनमत करून लिहिता वाचता न येणाऱ्या फिर्यादी दादाजी आहीरे यांच्या मालकीच्या म्हसरूळ शिवारातील घराचे खोटे मुखत्यारपत्र, खोटे सातबारा उतारे लावून बनावट खरेदीखत तयार करून फसवणूक केली आहे.