खोटी केस करण्याचा धाक दाखवत तरुणीचा विनयभंग!

नाशिक( प्रतिनिधी) : नाशिकमधील पंचवटी परिसरात दुचाकी चोरली आणि जातीवाचक शिवीगाळ केली अशी खोटी केस करण्याची धमकी देत युवतीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आलाय. या प्रकरणी युवतीने पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पीडित युवतीने दिलेल्या तक्रारी नुसार श्रीकांत सुरेंद्रसिंग उर्फ चंदू (रा. गजपंथ नगर, म्हसरूळ) असे संशयित आरोपीचे नाव आहे. तक्रारदार युवती संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास कॉलेज मधून घरी जात असताना संशयिताने युवतीजवळ येऊन फेसबुक वरून फोटो घेऊन त्याला इमोजी लावून तिला दाखवले. तू माझी गाडी चोरली आणि मला जातीवरून शिवीगाळ केली अशी खोटी केस करून त्यात अडकवण्याची धमकी दिली. याप्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात विनयभंग केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.