कौतुकास्पद : नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच….

नाशिक (प्रतिनिधी) : नाशिकच्या इतिहासातील पहिलीच ऐतिहासिक घटना घडली आहे. नाशिकच्या चार तरुणांची एकाच वेळी लष्करात अधिकारी म्हणून निवड झाली आहे.

देहरादून येथील इंडिअन मिलिटरी अकॅडमीमध्ये नाशिकचे तीन युवक भारतीय युवक लष्करात अधिकारी म्हणून लेफ्टनंट पदावर रुजू झाले आहेत. अनुग्रह देशमुख, ऊर्मिल तरले, आणि शाहू काळे अशी या तीन युवकांची नवे आहेत. एकाच वेळी नाशिकचे हे चार युवक लष्करात अधिकारी झाल्याची घटना नाशिकच्या इतिहासात पहिल्यांदाच घडली आहे असे सांगितले जात आहे.