कौटुंबिक वादातून पत्नीवर वस्ताऱ्याने वार : घटना पंचवटीतली

नाशिक (प्रतिनिधी) : पंचवटीतील समर्थ नगर गार्डनजवळ असलेल्या मॉडर्न कॉलेजनजीक राहणाऱ्या दीपक पवार ने आपल्या पत्नीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना गुरुवारी (दि.३०) घडली आहे. कौटुंबिक वादातून आपली पत्नी पूजा पवार हिच्या गळ्यावर वस्ताऱ्याने वार करून तिला गंभीर दुखापत केली. याप्रकरणी योगेश चौधरी यांनी पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे.
योगेश चौधरी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार संशयित दीपक आणि त्याची पत्नी पूजा यांच्यामध्ये कौटुंबिक कारणावरून भांडण झाले आणि रागात येऊन दिपकने तिच्या गळ्यावर वस्ताऱ्याने वार करून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. तिच्यावर आता रुग्णालयात उपचार सुरु असून पंचवटी पोलीस ठाण्यात दीपक विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.