कोरोनाला हरवण्यासाठी मध्य रेल्वेचा पुढाकार…

नाशिक (प्रतिनिधी) : कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका तसेच प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहेत. त्यासोबतच आता मध्य रेल्वेने सुद्धा मदतीचा हात पुढे केला आहे. मध्य रेल्वेने भुसावळ, सोलापूर रेल्वेस्थानकासह अनेक भागांमध्ये चोवीस तास काम करणारी वैद्यकीय पथके नियुक्त केली आहेत. त्यासोबतच आता नाशिक रोड रेल्वे स्थानकातही ही पथके नियुक्त करण्यात आली आहे. ही वैद्यकीय पथके कोरोना विरोधातील लढाईत युद्धपातळीवर काम करत आहेत.

नाशिक रोड रेल्वे स्थानकात मध्य रेल्वेकडून गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा विकसित करण्यात आले आहे. यात प्रत्येक प्रवाशाची स्क्रीनिंग आणि ऑक्सिजन तपासणी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे रेल्वेस्थानकावर स्वच्छतेवर भर दिला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा वापर होणार आहे.