कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी टोकन सिस्टीम!

नाशिक (प्रतिनिधी) : स्थायी समितीकडून कोरोनाबाधीतांच्या समस्यांवर तोडगा निघावा यासाठी कोविड विशेष बैठक घेण्यात आली. संपूर्ण शहरात कोरोनाबाधित रुग्णांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या अडचणी आणि रुग्णालयाची जादा बिले याबाबतीतील तक्रारींवर तोडगा काढण्यासाठी या बैठकीत रुग्णांसाठी टोकन सिस्टम राबवण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या संदर्भात सभापती गणेश गीते यांनी प्रशासनाला कार्यवाही करण्याचा सूचना दिल्या.

समितीतील सदस्याना कोरोनाविषयक तक्रारी तसेच सर्व सामान्य नागरिकांचे हाल लक्षात घेता ही सभा आयोजित करण्यात आली. या वेळी सर्व सामान्य रुग्णांना उपचारावेळी महानगरपालिकेचे नियंत्रण राहावे यासाठी टोकन सिस्टीम राबवण्यात आली. महापालिका रुग्णालयातून खाजगी रुग्णलयात दाखल होत असताना सदर रुग्णाला टोकन देण्यात येणार असून त्या नंतर डिस्चार्ज पर्यंत रेकॉर्ड ट्रॅक करण्यात येणार आहे.

यावेळी रुग्णसंख्या वाढत असताना त्यांची उपचारव्यवस्थेचा प्रश्न शहरातील रुग्णलयांतील अपूर्ण बेड, ऑक्सीजनसाठा, बिलातील फरक या सर्वच गोष्टीवर नगरसेवकांनी प्रश्न मांडले. तसेच बैठकीत  प्राथमिक आरोग्य केंद्रावर अँटीजेन चाचणी, तात्काळ मानधनावर फिजिशियन नेमणूक, बिले तपासणीसाठी भरारी पथक, नागरिकांच्या तक्रारींसाठी हेल्पलाईन नंबर, मुलतानपुरा रुग्णलाय लवकरात सुरु करून नवीन विद्युत वाहिनी कार्यरत होणार आहे. एमआरआय सिटी स्कॅन लवकरात कार्यरत होणार असे निर्णय या बैठकीत घेण्यात आले .