कोरोनाच्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी काय आहे नाशिक प्रशासनाची तयारी?

नाशिक (प्रतिनिधी) : महानगरपालिकेच्या सभागृहात कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या संदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या पुर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी मांढरे यांनी घेतला. कोरोनाच्या संभाव्य लाटेचा मुकाबला करण्यासाठी प्रशासानाने केलेली कार्यवाही बाबत आढावा सुद्धा घेतला. साधारणपणे मागच्या लाटेमध्ये आलेला अनुभव आणि तो हाताळत असतांना त्यामध्ये अजून काय सुधारणा करता येतील याविषयी चर्चा झाली.

यामध्ये असे दिसून येते की, मागीलवेळी मालेगावातील 1235 हा एका दिवसातील सर्वात मोठा आकडा होता. त्यातुलनेत आता दुप्पट जरी रुग्ण दाखल झाले, तरी आपण त्यांच्यावर योग्यवेळी उपचार करू या बाबतीत आपली तयारी खुप चांगली आहे. एक ते दिड टक्के लोकांना व्हेंटीलेटर लागते. आपण दुप्पट जरी धरले तरी तीन टक्के आणि पेशटची संख्या साधारणत: 2500 होते. त्यांच्यासाठी पुरेसे  व्हेंटिलेटर व बेडस् आपल्याकडे उपलब्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:  नाशिक: दहावीच्या पेपरमध्ये कॉपी करु दिली नाही म्हणून विद्यार्थ्यांची शिक्षकावर दगडफेक

पुढे बोलतांना जिल्हाधिकारी म्हणाले, पूर्व तयारीच्या दृष्टीने आपली तयारी चांगली आहे. रेमडेसिव्हीरचा मुबलक औषध साठा उपलब्ध आहे. ऑक्सीजनचा गेल्या वेळी तुटवडा भासला होता तो यावेळी भासणार नाही. आपल्या जिल्ह्यात ऑक्सीजनचे उत्पादन क्षमता 74 मेट्रीक टन पर्यंत पोहचली आहे. कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटे बद्दल जी चर्चा केली जाते त्याची व्याप्ती किती असेल ती अजून निश्चित नाही. परंतु रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात जरी वाढली, तरी आपण तिचा यशस्वी मुकाबला करु. नागरिकांनी देखील यापुर्वी आरोग्‍य प्रशासनाच्या नियमांचे पालन करून चांगला आदर्श घालून दिला होता. तसेच सहकार्य यापुढेही अपेक्षीत असून नागरिकांनी स्वत: बरोबर आपल्या कुटूंबाची देखील काळजी घ्यावी व नियमीत मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व सॅनिटायझरचा वापर करावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

हे ही वाचा:  Breaking: तुळजापूर- सोलापूर महामार्गावर झालेल्या अपघातात सिन्नरच्या तिघा तरुणांचा मृत्यू